कणकवली पर्यटन महोत्सवात कनकसंध्या या स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ

माजी गटनेते संजय कामतेकर यांच्या हस्ते उद्घाटन

तब्बल 250 स्थानिक कलाकारांचा आहे सहभाग

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांच्या कनक संध्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे माजी गटनेते संजय कामतेकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सुहास वरूनकर व हरिभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून व सूत्रधार श्री संजय मालडकर यांच्या कडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. तब्बल 250 स्थानिक कलाकारांना या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, हरिभाऊ भिसे, सुहास वरुनकर, संजय मालंडकर हनीप पिरखान, रवींद्र गायकवाड, राजू गवाणकर किशोर राणे मनीष पेडणेकर राजा पाटकर राज नलावडे उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!