तहसीलदार आर. जे. पवार यांचा मंत्री नितेश राणेंच्या हस्ते सत्कार

कणकवली, देवगड तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून केलेल्या कार्याचा गौरव

राज्याचे मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली मध्ये यापूर्वी तहसीलदार म्हणून काम केलेले व महसूल विभागात मोठ्या अदाबीने नाव घेतले जाणारे सध्या मुंबई येथे कार्यरत असणारे तहसीलदार आर जे पवार यांचा कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणकवली व देवगड मध्ये पवार यांनी उलीखनिय काम केलेले आहे. या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. समाजाभिमुख काम करत आर जे पवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत एक आदर्श निर्माण करून ठेवला होता. त्याच्यात एक भाग म्हणून हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माझी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगरसेवक विराज भोसले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!