नाणोस गावात मायनिंग कंपनीने ग्राम प्रशासनास कोणतीही लेखी पत्र न देता भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम अनधिकृत पणे सुरू केले ते त्वरीत बंद करणेबाबत प्रजासत्ताक दिनी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालय समोर ग्रामपंचायत सदस्य श्री सागर सोमकांत नाणोसकर यांचे उपोषण…
नाणोस गावातील डोंगराळ भागात एका मायनिंग कंपनीने ग्राम प्रशासनास व ग्रामस्थांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे भुवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे, हे निदर्शनास येतात दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले, पण त्या निवेदनाची त्वरीत दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाई झालेली दिसुन येत नाही,
एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणायचं आणि दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटेछोटे गाव मायनिंग बाधित करुन उद्ध्वस्त करायचे हि जर भुमिका सरकारची असेल तर याला कुठे तरी रोख बसायला हवा.
लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शास्वत व पर्यावरण पुरक विकास हवा आहे पण असे न होता सरकार मायनिंग सारखे गाव उध्वस्त होणारे प्रदूषणकारी प्रकल्प लोकांच्या माथी लादत आहे, एखादी मायनिंग कंपनी गावात भूवैज्ञानिक सर्वेक्षण काम सुरू करत असेल पण त्याची जर ग्राम पंचायतला कल्पनाही देत नसेल तर ती गंभीर बाब आहे, प्रथम त्या गावातील ग्रामपंचायत ला लेखी पत्र सादर कंपनीने व संबधित जिल्हा खनिकर्म विभाकडून देणे क्रमप्राप्त आहे, परंतु हे जिल्हा प्रशासनाकडून होत नाही , संबधित विगात चोकशी केली असता समाधानकारक माहीती दिली जात नाही, गावातील ग्रामस्थ हे माहीतीसाठी, चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन विचारणा करतात त्यावेळी ग्रामस्थांना अपेक्षित उत्तर देण्यासाठी काहीच माहीती ग्रामपंचायत जवळ नसल्याने गावात गैरसमजुती ने चुकीची माहीती पसरून भितीचे वातावरणात निर्माण केले जाते, तेव्हा कोणत्याही गावात मायनिंग कंपनीकडून भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे अगोदर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायत ला पत्र पाठवून माहीती देण्यात यावी.
यामुळे सध्या नाणोस गावात मायनिंग कंपनीकडून अनधिकृतपणे सुरू असललेले भूसर्वेक्षणाचे काम बंद न झाल्यामुळे “प्रजासत्ताक दिनी” दि.२६ जानेवारीत २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर श्री. सागर सोमकांत नाणोसकर (ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष -मायनिंग संघर्ष उप समिती नाणोस ) हे उपोषणाला बसणार आहेत..