खारेपाटण -टाकेवाडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय मंजूर कामाचे भूमीपूजन संपन्न
मुंबई -गोवा महामार्ग येथे असणाऱ्या खारेपाटण -टाकेवाडी येथील नियोजित जागेमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय मंजूर कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 300000 निधी उपलब्ध झाला असून या मंजूर कामाचे भूमीपूजन खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रा.पं. सदस्य सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,किरण कर्ले,अमिषा गुरव,क्षितीजा धुमाळे व टाकेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.