हरकुळ बु. मध्ये आकाशगंगा व तारे दर्शन उपक्रम

नेहरु तारांगणचे वरिष्ठ प्राध्यापक खगोल शास्त्रज्ञ एस्. नटराजन यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक

हरकुळ बु.।। समता सेवा संघ मुंबई संचलित, लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालय तर्फे ॲड. अशोक मधुकर सातवसे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प नेहरु तारांगण वरळी, मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक खगोल शास्त्रज्ञ श्री. एस्. नटराजन यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक शुक्रवार दि.१०/०१/२०२५ रोजी संध्या. ५.३० वा. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित केले आहे.
पोलिस निरीक्षक श्रीम. अनघा अशोक सातवसे व लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालयच्या शालेय समितीचे चेअरमन डॉ. सुहास पावसकर यांच्या संकल्पनेतून हरकुळ गावामधील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

नेहरु तारांगण वरळी, मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक खगोल शास्त्रज्ञ श्री.एस.

नटराजन हे गेली ३० वर्षे ग्रामीण भागातील हायस्कूल, कॉलेज, मोठ्या हाऊसिंग सोसायटीत, पर्यटन स्थळी प्रत्यक्ष जाऊन हा उपक्रम विनामुल्य राववत आहेत.

विद्यार्थ्यांबरोबरच जनतेसाठी आकाशगंगेतील ग्रह, तारे, धुमकेतू इत्यादी माहिती सुरुवातीला कलर्स लाईट्च्या माध्यमातून व नंतर टेलिस्कोप (दुर्विण) च्या माध्यमातून आकाशगंगेतील ग्रह, तारे, धुमकेतू इत्यादी दाखविले जाणार आहेत, मुलांमध्ये खगोलशास्त्राची उत्सुकता व आवड निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर समज, गैरसमज दूर करण्यासाठी मोफत उपक्रम राबवत आहे. सदर उपक्रमाचा विद्यार्थी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे मुख्याध्यापक सतिश नेवाळकर व डॉ. पावसकर यांनी आवाहन केले आहे.

या उपक्रमाबद्दल अधिक माहित आयोजन करण्यासाठी डॉ. सुहास पावसकर ९४२२३७३५३३ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!