कलमठ ग्रामपंचायत च्या ठाकरे गटाच्या सदस्य योगिता चव्हाण अपात्र

सलग सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका

कलमठ मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत च्या शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्य योगिता लवु चव्हाण या ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सलग सहा महिने पेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने त्यांना जिल्हा परिषदचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी अपात्र ठरवले आहे. 23 जानेवारी 2023 ते 24 जुलै 2023 पर्यंतच्या सर्व मासिक सभांना योगिता चव्हाण या सलग सहा महिने पेक्षा जास्त काळ पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिल्या होत्या. तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाला होता. योगिता चव्हाण यांना ग्रामपंचायत सदस्य रद्द का करू नये याची कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. तसेच गटविकास अधिकारी कणकवली यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता. योगिता चव्हाण यांनी नोटीस ला कोणताही समाधानकारक व नियमानुसार खुलासा दिलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 40 (1) (ब) नुसार त्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. कलमठ मध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

error: Content is protected !!