कणकवलीत आज रंगणार सलमान अली नाईट

कणकवली पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ आज

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे आवाहन

कणकवली पर्यटन महोत्सव 2025 आजपासून सुरुवात होत असून, या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आज कणकवली सायंकाळी शोभायात्रा ते अगदी सलमान आली नाईट पर्यंत विविध कार्यक्रमाने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सहित भाजपाचे प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 17 प्रभागाचे 17 चित्ररथ व त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री सलमान अली या इंडियन आयडॉल विजेत्या सुप्रसिद्ध गायकाच्या आर्केस्ट्रा याने आज शुभारंभाचा पहिला दिवस यादगार ठरणार आहे. या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!