गुढीपाडव्या निमित्त कणकवली येथे २२ रोजी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त, हिंदू नववर्ष स्वागतयात्रा बुधवार २२ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली आहे.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक मार्गे विद्यामंदिर मैदान अशी ही यात्रा असणार आहे . विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
यामध्ये भारतमातेचा वेषभुषेचा रथ, ओम् असलेले भगवे झेंडे घेतलेले ध्वजपथक,वारकरी दिंडी, धनगरी नृत्य ( गजानृत्य) पारंपारिक वेशभूषा घातलेले स्त्री-पुरुष व लहान मुले, भव्य दुचाकी रॅली,ढोल पथक, लेझीम पथक, महिला ढोल पथक, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. नववर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राने वाईट शक्तीचा नाश करत राम राज्याची सुरुवात करण्यासाठी अयोध्येमध्ये प्रवेश केला तोच हा मंगलमय दिवस व हिंदूंचा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा होय. नववर्षाचे स्वागत आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून स्वागतयात्रेत सहभागी व्हायचे आहे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली यांनी केलेले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!