“रोटरी आनंद मेळा २०२३” मुळे शहरात उत्साह.

भारतातील क्रमांक एकच्या एंटरटेनमेंट शो ला कणकवलीवासियांची पसंती.
सांस्कृतिक कार्यक्रम,विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल ने वाढविली रंगत.
उंच आकाशातून फिरणार पाळण ठरतंय रोटरी आनंद मेळ्याच आकर्षन.
कणकवली/मयुर ठाकूर.
कणकवली शहरात १० मार्च पासून “रोटरी आनंद मेळा २०२३” सुरु आहे.येथे दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सर्व कार्यक्रमांना शहर वासिय पसंती देत असून या आनंद मेळ्याला गर्दी पाहायला मिळत आहे.हा आनंद मेळा 22 मार्च पर्यंत असणार आहे. “रोटरी आनंद मेळा 2023 ” मध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच शहरवासियांसाठी विविध वस्तू खरेदीसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तसेच लहान मुलांपासून वृद्धानपर्यत सर्वांच्या एंटरटेनमेंटसाठी विविध खेळाच्या प्रकारांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यां रोटरी आनंद मेळा 2023 मुळे शहर वासियांना आनंद मिळत असून तालुक्यात चैतन्याच वातावरण आहे.