मुंबईवरील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्याना आज कणकवलीत श्रद्धांजली

सायंकाळी 6.30 वाजता कणकवली पोलीस स्टेशनला उपस्थित राहण्याचे आम्ही कणकवलीकर चे आवाहन
मुंबईवरील भ्याड हल्ला झाल्याच्या घटनेला सोळा वर्षे उलटून गेल्यानंतर
२६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी, तसेच राज्य घटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र जमून आणि “पेटवून एक-एक ज्योत राष्ट्र प्रेमाची” या मुद्याखाली कणकवली पोलीस स्टेशन येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता एकत्र होण्याचे आवाहन आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी येताना प्रत्येकाने सोबत एक मेणबत्ती आणण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे





