विद्यामंदिर चे शिक्षक जनार्दन शेळके यांची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढी मध्ये स्विकृत सदस्य म्हणून निवड

निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून केले जातेय अभिनंदन
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जेष्ठ शिक्षक जनार्दन शेळके यांची माध्यमिक – उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे स्विकृत सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री शेळके यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सहकार क्षेत्रातील सूक्ष्म अभ्यास तसेच सर्व सामान्य व्यक्तींशी असलेले सलोख्यांचे संबंध आणि अर्थविषयक धोरणांचा बारकाईने असलेला अभ्यास यांच्या जोरावर माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेला वैभवाचे दिवस प्राप्त होतील अशी अशा वाटते. श्री शेळके शिक्षक भारती या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करत आहेत अनेक सहकार्याच्या अडचणी आणि दुःख निवारण्याचे महत्वाचे काम ते नेहमी करत आहेत. संघनेचे पाठबळ आणि विकास यांच्या जोरावर पतसंस्थेच्याच्या उन्नतीसाठी सरांचा प्रत्येक क्षण मोलाचा ठरणार आहे म्हणून सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि पतपेढीच्या धोरणात्मक कार्यासाठी श्री जनार्दन शेळके यांची निवड झाल्या बद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .