नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे च्या आरफात चौगुले या विद्यार्थ्याची राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचा विध्यार्थी कु.अरफात हाफिज चौगुले याने नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेमध्ये सहावा क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कु.आराफात चौगुले या विद्यार्थ्याला प्रशाळेतील क्रीडा शिक्षक श्री.अमोल चौगुले आणि सुयोग राजापकर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल आदर्श एज्यकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोज गुळेकर यांनी अभिनंदन केले असून त्याला पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व संस्था पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. नीलम डांगे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





