नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल. नडगिवे येथे ‘दिपावली उत्सव’ मोठ्या दिमाखात संपन्न

संस्थेच्या सल्लागार पदी कांतीलाल कोथिंबीरे यांची निवड
आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे व एन. ई. एम. एस. स्मार्ट कीड्स तळेरे येथे मोठ्या उत्साहात “दिपावली उत्सव संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पदी मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. कांतीलाल कोथींबीरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रघुवीर राणे, सचिव श्री मोहन कावळे,सहसचिव श्री.ब्रम्हदंडे, खजिनदार श्री परवेज पटेल,श्री. विलास फराकटे,श्री.आशिष भोसले, श्री नयन दुधवडकर,रोटरी क्लब वैभववाडी चे अध्यक्ष श्री. प्रशांत गुळेकर,पी.आर.ओ.प्रविण पेडणेकर प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.ओंकार गाडगीळ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी व संगीत शिक्षक हेमंत तेली व श्रीकांत सुतार यांच्या साथीने स्वागतगीत व दिपावली गीत सादर करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे श्री. कांतीलाल कोथींबीरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री मनोज गुळेकर यांनी मुलांना यशस्वी जीवनाचे गमक सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभप्रसंगी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री कांतीलाल कोथींबीरे यांची संस्थेच्या सल्लागार पदी निवड करून त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते मानाची शाल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळी भेट (फराळ)देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. पूजा सावंत यांनी केले.





