खारेपाटण महाविद्यालयाच्या वतीने “दिवाळी विथ माय भारत” निहाय स्वच्छता जनजागृती व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून खारेपाटण येथे स्वच्छता जनजागृती रॅली आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छ्ता अशा उपक्रमांचे आयोजन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते.
भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना,प्रादेशिक संचालनालय, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या कडून मिळालेल्या निर्देशनानुसार “दिवाळी विथ माय भारत – ये दिवाळी माय भारत वाली” संकल्पनाधिष्ठित विविध उपक्रम २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान राबविण्याचे असून खारेपाटण येथे स्वच्छ भारत अभियान निहाय स्वच्छता व स्वच्छते विषयक जनजागृती रॅली द्वारे केली गेली.
या स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांच्या हस्ते केले गेले. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस प्रादेशिक (सिंधुदुर्ग) जिल्हा समन्वयक प्राध्यापक श्री. वसीम सय्यद,खारेपाटण सरपंच सौ.प्राची इस्वलकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्राजल कुबल व शेठ न. म. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय सानाप, आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाविद्यालय ते शिवाजी पेठ खारेपाटण अशी रॅली घोष वाक्याचा जल्लोषात खारेपाटण बसस्थानक येथे संपन्न झाली. रॅलीपश्चात खारेपाटण बाजारपेठ आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी रत्नमाला शेलार, विनिता मोरे,प्रथमेश पाटील,ऋषिल डोंगरकर आणि इतर एनएसएस विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!