महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

भगवती मंगल कार्यालय येथे होणार जाहीर सभा

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज
मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल करण्यात येणार आहे. सकाळी ठीक ९.३० वाजता महविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याकरता भगवती मंगल कार्यालय येथे मोठ्या संखेने उपस्थित रहावे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा घेतली जाणार आहे. यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!