रोटरी आनंद मेळा २०२३ चे शानदार उद्घाटन शनिवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्यावतीने “रोटरी आनंद मेळा २०२३” चे आयोजन.

कणकवलीत शहरात अनुभवायला मिळणार प्रथमच “भारतातील नंबर वन एंटरटेनमेंट शो”

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने रोटरी आनंद मेळा २०२३ चे उद्घाटन शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.हा रोटरी आनंद मेळा बुधवार दिनांक 22 मार्च पर्यंत असून गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत उत्साहात व आनंदात करून या आनंद मेळ्याची सांगता होणार आहे. रोटरी आनंद मेळा 2023 या सोहळ्यामध्ये शनिवार दिनांक 11 मार्च रोजी सोलो डान्स स्पर्धा,रविवार दिनांक 12 मार्च रोजी लोकनृत्य स्पर्धा, सोमवार दिनांक 13 मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धा,मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी लावणी स्पर्धा,बुधवार दिनांक 15 मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धा,गुरुवार दिनांक 16 मार्च रोजी ग्रुप डान्स शो,शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी महिलांसाठी खास स्पर्धा-मला पैठणी जिंकायची,शनिवार दिनांक 18 मार्च रोजी फॅशन शो,भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा,डॉग शो,पपी शो आणि कॅटल शो रविवार दिनांक 19 मार्च रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सोमवार दिनांक 20 मार्च रोजी गायन स्पर्धा,मंगळवार दिनांक 21 मार्च रोजी स्टँड अप कॉमेडी स्पर्धा,कणकवली वासियांना टेन्शन फ्री करण्यासाठी खास गाण्याच्या कॉमेडीचा बुस्टर डोस, हृदय सम्राट प्रा अजित कोष्टी यांचा कार्यक्रम,बुधवार दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत जोरदार,उत्साहात,आनंदात करण्यासाठी धम्माल मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा,तसेच फूड फेस्टिवल, इंटरनॅशनल ॲनिमेटेड पक्षी व प्राणी एक्झिबिशन,शॉपिंग फेस्टिवल,फूड फेस्टिवल तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आपल्या कणकवली शहरात प्रथमच “भारतातील नंबर वन एंटरटेनमेंट शो” अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.हा रोटरी आनंद मेळा 2023 उपजिल्हा रुग्णालय समोरील ग्राउंड, ता.कणकवली,जिल्हा सिंधुदुर्ग येथे होत असून या “रोटरी आनंद मेळा 2023” सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने होत आहे.

मयुर ठाकूर./ कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!