महिला सशक्तीकरणासाठी कायद्याचे पाठबळ आवश्यक: ॲड. शरयू पाटील
घोडावत विद्यापीठात जागतिक महिला दिन साजरा
जयसिंगपूर: महिलांना संरक्षण मिळावे व त्यांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी कायद्याचे पाठबळ अवश्यक आहे असे मत घोडावत विद्यापीठातील महिला अंतर्गत तक्रार समितीकडून, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ॲड. शरयू पाटील यांनी मांडले.
महिलांचा विकास व पीडितांचे पुनर्वसन होण्यासाठी संविधानामध्ये कायद्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.स्त्री पुरुष समानतेसाठी कायदेशीर आणि मानसिक स्तरावर प्रबोधन होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले या प्रसंगी म्हणाले, की प्रत्येक दिवस हा महिला दिन असावा.महिलांनी उत्तम शिक्षण घेतल्यास त्यांचे सशक्तिकरण नक्कीच होईल. विद्यापीठातील महिला अंतर्गत तक्रार समितीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी समिती सदस्या प्रा.सरिता पाटील,डॉ. संभाजी पवार प्रा.विद्याराणी खोत व विद्यार्थिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन आफिया हिने केले तर आभार समितीच्या अध्यक्षा शुभांगी देशमुख यांनी मानले.कार्यक्रमासाठी किशोर सूर्यवंशी यांनी सहाय्य केले.
यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले.