सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

खो-खो स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलांचा संघ जिल्ह्यात प्रथम

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाअधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो या क्रीडा प्रकाराचे सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण मधील विद्यार्थ्यांनी खो-खो या क्रीडा प्रकारात घवघवीत संपादन केले आहे.
दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी सिंधुदुर्ग नगरी ओरोस क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलांच्या गटात खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने खो-खो चे उत्तम प्रदर्शन करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. वरील प्रथम क्रमांकाचा संघ हा विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.पाडवी सर व श्री. भिसे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सेक्रेटरी श्री. महेश कोळसुलकर, संचालक श्री. प्रशांत गुळेकर सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!