सकल मराठा समाज,खारेपाटण पंचक्रोशी यांच्यावतीने बँकामध्ये देण्यात आले निवेदन

बँकेतील व्यवहारासाठी उपलब्ध असणारे फॉर्म मराठी भाषेत मिळावे अशी करण्यात आली मागणी

सकल मराठा समाज, खारेपाटण पंचक्रोशी यांच्या वतीने खारेपाटण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र येथील मॅनेजर यांना प्रत्यक्ष भेट देऊन बँकेत विविध व्यवहारासाठी उपलब्ध असणारे फॉर्म हे मराठीत उपलब्ध करून दयावे अशी मागणी असणारे निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हंटले आहे की,बँके मध्ये विविध व्यवहारासाठी खातेधारकांना विविध फॉर्म उपलब्ध करून दिले जातात. परंतु हे सर्व फॉर्म इंग्रजी व हिंदी या भाषेत असतात. खारेपाटण परिसरातील खातेधारक हे ग्रामीण भागातील असल्यामुळे असे फॉर्म वाचणे व माहिती भरणे कठीण जाते. तसेच नुकताच आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आपणास विनंती आहे की, कृपया सर्व प्रकारचे फॉर्म इंग्रजी व हिंदी प्रमाणे मराठी भाषे मध्ये उपलब्ध करून मिळावेत. अश्या प्रकारची लेखी मागणी सकल मराठा समाज, खारेपाटण पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच स्टेट बँकेचे ATM हे गेले काही महिने बंद असल्याने ग्राहकांचे हाल होतं आहेत त्यामुळे ATM सुद्धा सुरळीत व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली. तसेच स्टेट बँक मधील वाढीव लिपिक शाखेकरिता उपलब्ध करून देण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशी अध्यक्ष श्री.रमाकांत राऊत, उपाध्यक्ष श्री.अरुण कर्ले, इतर कोअर कमिटी सदस्य सर्व,
श्री.प्रताप फाटक, सुबोध देसाई, चंदू काका शिंदे, रामचंद्र उर्फ बाळा राऊत, गुरुप्रसाद शिंदे, दिगंबर भालेकर,बबलू पवार, संदीप सावंत, चंद्रकांत मण्यार, नाना शिंदे, चंद्रमोहन शिंदे,रोहिदास शिंदे, सुनील कर्ले ,धनराज शेलार, सूर्यकांत पवार, भूषण शेलार इतर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!