कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ च्या वतीने शिवजयंती साजरी

विविध स्तरातील नागरिक, लोकप्रतिनिधीनी केले छत्रपतींना अभिवादन

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व विविध स्तरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर, खजिनदार आनंद पारकर, वागदे सरपंच संदीप सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, यंगस्टार मित्र मंडळाचे उपाध्यक्ष भैया आळवे, दत्ता काटे, शिवा गावकर, जय शेट्ये, चेतन मुंज, मंगेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!