कोळंबाची जत्रा 7 मे रोजी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सुप्रसिद्ध कोळंबाची जत्रा रविवार दिनांक 7 मे रोजी होत आहे. श्री देव कोळंबा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नागेश. मोरये यांनी ही माहिती दिली.
सकाळी आठ ते नऊ पूजा विधि नऊ ते दुपारी दोन पर्यंत नवस्फूर्ति दुपारी बारा ते चार नवीन नवस आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेमध्ये महाप्रसाद असे साधारण या उत्सवाचे स्वरूप राहील भाविकांनी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहनही मोरये यांनी केले आहे.