गाबीत समाजातील वधू – वर यांची मोफत नाव नोंदणी, संपर्क करण्याचे आवाहन
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील मुला – मुली करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित समाजातील वधू – वर यांना विवाह संबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विवाहास उशीर आणि त्यांच्या ठराविक वयात लग्न जमत नाहीत ते कसे जमणार ,लग्न जमण्यास काही अडचणी आणि इतर महत्वाच्या मार्गदर्शन तज्ञांमार्फत वाडी वाडी येऊन देण्याचा मानस आहे याउद्देशाने आपली माहिती संकलित झाल्यावर मालवण,देवगड,वेंगुर्ले तालुक्यातील गावांमध्ये वाडी वाडीत वधू – वर आणि त्यांच्या सोबत पालक घेऊन प्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन चर्चा घडून आणून समाजात वधू – वर यांचे लग्न जुळणे हा मानस आहे. समाजातील मुलां मुली याच्यासमोर हवे तसे शिक्षण ,नोकरी,व्यवसाय असूनही आई वडिलांसमोर मोठी समस्या भेडसावत आहे .हे लक्षात घेता समाजातील मुलांनी आणि पालकांनी एकत्रित यावे याकरीता समाजातील वधू आणि वर यांनी व त्यांच्या पालकांनी या गंभीर समस्या जवळ त्वरित लक्ष देऊन आपल्या मुला मुलींच्या पत्रिका आणि अपेक्षा तसेचआपली माहिती पाठवावी. त्यामुळे लग्ने जमन्यास ज्या ज्या अडचणी मुलांन बरोबर पालकांना पडलेली असल्याने लग्न होण्यास विलंब होत आहे त्यावरच आपण एकत्र येऊन तडजोड अतिशय उत्कृष्ठ मार्गदर्शन होईल .असे आवाहणं विशेष मागास प्रवर्ग समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
इच्छुक वधू – वर यांनी आपली माहिती खालील प्रतिनिधी श्री.अनिल कुबल ९४२३२६४५६७, श्री.बाळू वस्त ९३७१२१७६०६ ,श्री. शंकर पोसम ९१६७७२९१३६, श्री. नाना कुमठेकर ९४०५६३७९००, श्री.दाजी जुवाटकर ८२६२०३०४७७ ,श्री.तुळशीदास कासवकर ८२६२८९८३८७,श्री. हेमंत बांदेकर ९०८२८४६६२२ , यांच्याजवळ जास्तीत जास्त वधू – वर आणि पालक यांनी मोफत नोंदहून आपण आपली माहिती लवकरात लवकर द्यावी. अशी विनंती विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री.सुरेश बापर्डेकर यांनी समाज बांधवांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात न म्हटले आहे.
कणकवली/सित राज परब