उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्यावतीने रिक्षाचालक प्रवीण गावडे यांचा सत्कार
प्रमाणिकपणा दाखवत 20 हजार रुपये असलेले पाकीट केले होते परत
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर यांनी आज प्रामाणिक रिक्षा चालक प्रवीण गावडे यांचा सत्कार केला. कणकवली रेल्वे स्थानक येथील रिक्षा स्टँड मध्ये हा कार्यक्रम झाला.
दोन दिवसापूर्वी रिक्षा चालक प्रवीण गावडे यांना नरडवे रस्त्यावर उपजिल्हा रूग्णालयासमोर एक पैशाने भरलेले पाकीट सापडले होते. या पाकिटातील ओळखपत्रावरून हे पाकीट महसूल कर्मचारी संभाजी खाडे यांना परत करण्यात आले. या प्रामाणिकपणा बद्दल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रिक्षा चालक प्रवीण गावडे यांचा आज सत्कार करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर यांनी कणकवली रेल्वे स्थानकातील रिक्षा स्थानकात येऊन श्री.गावडे यांचा सत्कार केला. यावेळी परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनंजय हिले. महसूल अधिकारी रुपेश कुडाळकर, वैभव राणे, ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत, रिक्षा चालक संजय मालंडकर तसेच इतर रिक्षा चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.