बिडवाडी -मुडेडोंगरवाडी येथील जलजीवन मिशन योजना लवकरात लवकर पूर्ण करा
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व बिडवाडी माजी सरपंच सुदाम तेली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
30 नोव्हेंबर पर्यंत काम न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा
बिडवाडी मुडेडोंगरवाडी येथील मागील एक वर्षा पासून जल जीवन मिशन योजनेचे काम ठप्प आहे. मुडेडोंगरवाडी ही वाडी उंच ठिकाणी असल्यामुळे त्या वाडीच्या ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासत आहे. आणि हे जल जीवन मिशन चे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास पाण्याची मोठी समस्येतुन या वाडीच्या ग्रामस्थांना जावे लागणार आहे. ठेकेदार काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे आता पर्यंत 50% च काम पूर्ण झाले आहे. हे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास या वाडीच्या ग्रामस्थांची पाण्यामुळे हाल होणार आहेत. या वडीचा भाग उंच ठिकाणी असल्याकारणाने हे जल जीवन मिशन चे काम नोव्हेंबर च्या आधी पूर्ण कराचे यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व बिडवाडी गावचे मा. सरपंच सुदाम तेली यांच्या नेतृत्वाखाली मुडेडोंगरवाडी च्या ग्रामस्थांनी ओरोस येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. व येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बिडवाडी गावचे मा. सरपंच सुदाम तेली, तुशीदास तांबे, दीपक कालिंगण , रमेश तांबे, सागर तांबे, प्रभाकर तांबे, सूर्यकांत तांबे व आदी मुडेडोंगर वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.