लाडके नेते पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या अतूट प्रेमापायी वेतोरे येथे जमला हजारो माता भगिनींचा जनसागर!

दादा, तुम्ही आयुष्यवंत, कीर्तीवंत व्हा! “रेकॉर्ड ब्रेक” गर्दीच्या कार्यक्रमातून वेतोरे पंचक्रोशीतील हजारो मायभगिनींनी दिल्या रविंद्र चव्हाण यांना भरभरून शुभेच्छा!
भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात यावेळी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम संपन्न झाले. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाच्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी उपस्थित राहून आदरणीय श्री रविंद्रजी चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या महिलांना माननीय रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्री.विशाल परब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी कृषीपयोगी साहित्याचे वाटपदेखील करण्यात आले. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बचत गटांचे उत्पन्न वाढण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी सहकार्य करणार असून त्या दृष्टीने आजवर सदैव प्रयत्नशील असलेल्या पालकमंत्र्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातला आजचा आनंद आमच्यासाठी फार मोठा आहे, असे प्रतिपादन या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर ॲड. अनिल निरवडेकर, वेतोरे सरपंच मा. प्राची प्रदीप नाईक, उपसरपंच श्री विक्रम सावंत, ग्रामपंचायत सदस्य मा. साक्षी गणपत राऊळ, श्री.प्रकाश गावडे, श्री.विनायक गावडे, संगीता नाईक, सुजाता वालावलकर, तुषार नाईक मीनाक्षी शिरोडकर, संतोषी गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती समिधा नाईक, पंचायत समिती सदस्या सौ स्मिताताई दामले, माजी सरपंच राधिका गावडे, ज्येष्ठ नागरिक आबा नाईक, मा.सोसायटी चेअरमन श्री विजय वासुदेव नाईक, श्री विजय रेडकर, श्री प्रशांत नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री प्रणव वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते





