कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
सिंधुदुर्ग : राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात (konkan) आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला आहे. तर कोकणात (konkan) आज उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा. त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग