जागतिक महिला दिन निमित्त ग्रामपंचायत नाणोस व श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस ठिकाणी खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम सपन्न
सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत नाणोस व श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस येथे मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ महिला, गावातील उद्योजिका,यशस्वी मुली यांचे सत्कार समारंभ असा बहारदार सोहळा पंचक्रोशीतील महिला सरपंच आणि महिलांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि द्विपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळेतील मुलांनी ईशस्तवन आणि ग्रामसंघाच्या महिलांनी स्वागतगीत सादर केले.
यावेळी तिरोडा गावच्या सरपंचा सौ प्रियांका सावंत,भोमवाडी सरपंचा सौ विद्या वराडकर (वाडकर),धाकोरा सरपंचा सौ स्नेहा मुळीक,चोडणकर बाई,नेवगी बाई,शेणई बाई आदी उपस्थित होत्या.
यावेळी नाणोस सरपंचा सौ प्राजक्ता शेट्ये यांनी महिला दिनावर विचार व्यक्त केले तसेच ग्रामसेवक करंगुटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत उपसरपंच सौ अमिता नाणोसकर,सौ संध्या नाणोसकर,श्रीपाद ठाकुर,विनायक शेट्ये,सौ रसिका जोशी,सौ सानिका शेट्ये यांनी केले.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, कर्मचारी यांचे स्वागत श्रीदेव वेतोबा ग्रामसंघ यांचे पदाधिकारी सौ नयन कांबळी,सौ.रतिष्मा शेट्ये,सौ.सुप्रिया गोडकर यांनी केले.
खेळ पैठणीचा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम युसूफअलि आवटि यांनी आपल्या सुरेख कौशल्याने संपन्न करुन या पैठणीचा आणि संगित खुर्ची विजेता घोषित केला तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी आणि सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी जेवण व्यवस्था संजय नाणोसकर,दादा पालयेकर,चंद्रकांत शेट्ये,अरुण नाणोसकर,नाना कांबळी यांनी केलि.मंडप व्यवस्था चेतन भगत यांनी केली.
खेळीमेळीच्या या सोहळ्यास माजि सरपंच बाळकृष्ण जोशी,गुरव गुरूजी,परब गुरुजी,मिलिंद नाणोसकर,शारदा जोशी,प्रदीप परब,रघुनाथ जोशी,दाजी तळकर,नाणोस युवा मित्र मंडळ, विविध मान्यवर,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी केले.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी