इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम


39दिवस चालणार गणेशोत्सव


आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या 39दिवस चालणारया गणेशोत्सवात देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .यानिमित्त शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी श्री ब्राह्मदेव मिराशी वाडी व महापुरुष मित्र मंडळ वरची वाडी पुरस्कृत दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवार 21 सप्टेंबर रोजी विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळ राठिवडे प्रस्तुत दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. सोमवार 23 सप्टेंबर रोजी श्री ब्राम्हण देव गावूडवाडी मित्र मंडळ आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे .मंगळवार 24 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर उर्फ चावल मुजावर मित्र मंडळ पिरावाडी आयोजित आरडीएक्स क्रू ग्रुप सावंतवाडी यांचा कलाविष्कार सादर होणार आहे .बुधवार 25 सप्टेंबर रोजी समर्थ नगर वरची वाडी पुरस्कृत आमने-सामने डबलबारीचा सामना बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध रिया मेस्त्री यांच्यात रंगणार आहे. गुरुवार 26 सप्टेंबर रोजी देऊळवाडी मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये वचषक, द्वितीय 5000 रुपये व चषक ,तृतीय तीन हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे .अधिक माहितीसाठी संपर्क अर्जुन बापर्डेकर 9420082320

शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत चिमणी पाखरे डान्स अकॅडमी कुडाळ यांचा जलवा 2024 हा कार्यक्रम होणार आहे .शनिवार 28 सप्टेंबर रोजी शिवरामेश्वर गिरीश बाणे,उमेश बाणे यांच्या सौजन्याने लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावता नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे .रविवार 29 सप्टेंबर रोजी वाडोळी मित्र मंडळ भंडारवाडी पुरस्कृत श्री उदय साटम मुंबई निर्मित मराठी पाऊल पडते पुढे हा आर्केस्ट्रा सादर होणार आहे. सोमवार 30 सप्टेंबर रोजी व्यापारी मंडळ आचरा व वैभवशाली पतसंस्था पुरस्कृत ह भ प वर्षारानडे- सहस्त्रबुद्धे पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .याला संगीत साथ हार्मोनियम पप्पू नाईक कुडाळ तबला श्री शिवाजी पवार , पखवाज गजानन देसाई यांची लाभणार आहे .देऊळवाडी मित्र मंडळ आयोजित बुवा श्री विजय परब विरुद्ध बुवा श्री लक्ष्मण गुरव यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुधवार 2 ऑक्टोबर रोजी ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत एक रहस्यमय दोन अंकी नाटक डबल गेम सादर होणार आहे. गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी ईसवटि महापुरुष मंडळ जांभूळवाडी पुरस्कृत लोकराज्य सुधीर कलिंगन प्रस्तुत ट्रिक्स सिनयुक्त दशावतारी नाटक व्यंकटेश पद्मावती सादर होणार आहे .शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी बालगोपाळ मंडळ आचरा वरची वाडी आयोजित जिल्हास्तरीय गरबादांडीया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार पाच ऑक्टोबर रोजी ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडी आयोजित खुली समुह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी
प्रथम क्रमांक पंधरा हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक दहा हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक तृतीय क्रमांक पाच हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक आणि सहभागी संघांना मानधन आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .यासाठी संपर्क 9420080404 मुकेश सावंत 94212377 63 , अनंत दीपक गावडे 82756495 67 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे रविवार 6 ऑक्टोबर रोजी श्री भवानी रामेश्वर डंपर सर्विस मनोज हडकर पुरस्कृत मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. सोमवारी सात ऑक्टोबर रोजी देऊळवाडी मित्र मंडळ आयोजित आमने सामने डबलबारीचा सामना बुवा श्री अखिलेश फाळके विरुद्ध बुवा संदीप पुजारे यांच्यात डबलबारीचा सामना होणार आहे. मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी नऊ वाजता भाजप नेते निलेश राणे पुरस्कृत महिलांसाठी खास खेळ पैठणीचा -लाडकि बहीण हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी
संपर्क बाबू कदम 94 21 57 4700 तेजस सीता केळुसकर 94 0445 78 35 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बुधवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे .तर रात्रौ आमने सामने डबलबारी चा जंगी सामना बुवा व्यंकटेश् नर विरुद्ध बुवा संतोष शितकर यांच्यात होणार आहे शुक्रवार रविवार 13 ऑक्टोबर रोजी रात्रौ डोंगरेवाडी ग्रामस्थ पुरस्कृत श्रीकृष्ण कला मंच किन्नर दापोली यांचा सांस्कृतिक वारसा जपणारा कोकणचा कार्यक्रम शक्ती तुरा शाहीर पप्या जोशी सह बबलू जोशी सादर करणार आहेत. सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी रात्री खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी दुपारी ढोलताशांच्या गजरात श्रीच्या मुर्ती चे आचरा पिरावाडी समुद्र किनारी
विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो–रामेश्वर सभागृहात स्थानापन्न करण्यात आलेला गणपती बाप्पा

error: Content is protected !!