मूर्तिकार अर्थसाह्य योजना जाहीर करून देखील अद्याप मूर्तिकार उपेक्षित

वराती मागून घोड्यांचा उपयोग काय?

मूर्तिकारांमधून उपस्थित केला जातोय सवाल

सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष शिक्षणमंत्री दीपक केसरकर लक्ष देतील काय?

गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मात्र अद्याप पर्यंत मूर्तिकारांना अर्थसहाय्य योजना जाहीर करून देखील या मूर्तिकारांना या अर्थसाह्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. सिंधु रत्न योजनेअंतर्गत मूर्तिकरांना ही रक्कम देण्याची चर्चा झाली होती. दरम्यान ग्रामपंचायत विभागाकडून तालुकास्तरावरून याकरिता मूर्तीकरांचे अर्ज देखील मागविण्यात आले होते. तालुक्याला मृतिकराने अर्ज सादर केल्यानंतर हे अर्ज जिल्हास्तरावर पाठविले होते. सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून याबाबत तात्काळ उपायोजना होतील अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप पर्यंत या योजनेअंतर्गत मूर्तिकारांना अर्थसहाय्य मिळालेले नसल्याने गणेश चतुर्थीच्या तोंडावर अर्थसाहाह्य मिळाले नसेल तर वराती मागून घोडे काय कामाचे? असा सवाल आता या मूर्तिकारांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्तिकारांनी अर्ज केलेले असताना या मूर्तिकारांना मूर्ती रंगरंगोटी च्या काळातच हे अर्थसहाय्य मिळाले असते तर त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग त्यांना करता आला असता. केवळ एका कणकवली तालुक्यातूनच जवळपास अडीचशेहून अधिक प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहेत. अशी जिल्ह्याची आकडेवारी पाहिली असता हे प्रस्ताव केव्हा मंजूर होणार व ही रक्कम केव्हा मिळणार ही बाब अस्पष्ट आहे. 50 हजार रुपये एका मूर्तीकाराला हे अर्थसहाय्य देण्यात येणार होते. मात्र अद्याप याची पूर्तता झालेली नाही. शासनाने घोषणा केल्यानंतरही रक्कम अद्याप मिळण्यासाठी किती दिवस लागतील हे सुद्धा अजून अधांतरीच असल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!