युवासेना आयोजित घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आयोजन

कणकवली विधानसभा मर्यादित असणार स्पर्धा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्यातील गणेश भक्तांसाठी मर्यादित राहील. यात कणकवली विधानसभेतून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 3,000 रुपये तर कणकवली तालुक्यातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 3,000 देवगड तालुका प्रथम रोख रक्कम 3,000, रुपये वैभववाडी तालुका प्रथम रोख रक्कम 3,000 व सर्वाधिक Like पारितोषिक रोख रक्कम 3,000 रुपये अशी भव्य बक्षीसांची घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धा आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेज Official_naik_sushant याला फॉलो करा. या स्पर्धेसाठी पुढील नियम ठेवण्यात आले आहेत. १) आपल्या गणेश सजावतीचा ६० सेकंदाचा 9021635187 या Whatsapp क्रमांकावर नाव व पत्ता सहा पाठवा. २) स्पर्धेचा व्हिडिओ ६० सेकंद पेक्षा जास्त नसावा. ३) आपण पाठविलेला व्हिडिओ Official _naik_sushant च्या इंस्टाग्राम वर प्रसारित केले जातील. त्या वरून सर्वोत्तम Like हे पारितोषिक देण्यात येईल. ४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ५) स्पर्धेचा कालावधी दि. ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत राहील. ६) स्पर्धकांना Official_naik_sushant पेज फॉलो करणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत कणकवली -देवगड – वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी व युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!