सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी २ हजार लिटर पर्यंत पिण्यासाठी मोफत पाण्याची व्यवस्था

शिवसेना तालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांचा उपक्रम
कणकवली : सध्या कडक उन्हाळा चालू झाला असून, या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी आयोजित होणारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम या करीता पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. अशा कार्यक्रमांच्या वेळी पाण्यासाठी महिलांची होणारी धावपळ विचारात घेऊन महिला दिनाचे औचित्य साधत गेली काही वर्षे सातत्याने शिवसेना तालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेला उपक्रम यावर्षी देखील सुरू ठेवण्यात आला आहे. तरळे पंचक्रोशीतील धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम याप्रसंगी लागणारे सुमारे 1 ते 2 हजार लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मोफत पुरवण्याची व्यवस्थ तालुकाप्रमुख शरद वायगणकर मित्रमंडळा च्या वतीने करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जर कोणत्याही कार्यक्रमासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यास याबाबत योगेश मुद्राळे 9405218278, वैभव कांबळे 8956012702, सुभाष राणे 9404167448, मंगेश गुरव 9422433760 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर /कोकण नाऊ / कणकवली