साकेडी शाळेमध्ये उद्या खेळ पैठणीचा

विविध स्पर्धांचे देखील करण्यात आले आहे आयोजन

गावातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

कणकवली : जि . प. पू. प्राथमिक शाळा साकेडी नंबर १ च्या विद्यार्थ्यांच्या सर्व महिला पालकां साठी गुरूवार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळा साकेडी नंबर १ येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फनीगेम्स, नृत्याविष्कार, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशाप्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून स्मार्ट सुनबाई साकेडी हा पैठणीचा खेळ आयोजित केला आहे. सर्व महिला पालकांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा तसेच ज्या महिलांची मुले शाळेत नाहीत त्यांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. ९ मार्च रोजी सकाळी ठिक १०.२० वाजता साकेडी नं. १ शाळेत उपस्थित रहावे.या स्पर्धामध्ये तीन नंबर काढण्यात येणार असून आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी केले आहे.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!