रिंग रोडचा महत्वपूर्ण टप्पा खुला होत अखेर अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरले!

नगरसेविका मेघा सावंत यांनी मानले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह जमीन मालकांचे आभार

गणेश मंदिर काढुन कोष्टी समाजाने शहर विकासासाठी घालून दिला वेगळा आदर्श

कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला गांगो मंदिर- टेंबवाडी – रवळनाथ मंदिर पर्यंत रिंग रोड मंजूर केल्यानंतर त्याचे काहीच दिवसात प्रत्यक्षात काम हाती घेण्यात आले. त्यामुळे कणकवली वासियांचे गेली अनेक वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले असून, लवकरच हे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे. कणकवली शहरवासीयांमधून या रिंग रोडच्या सत्यात उतरण्याने समाधान व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती नगरसेविका मेघा महेश सावंत यांनी दिली. प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका असलेल्या मेघा महेश सावंत यांच्या मागणीनुसार गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कणकवली शहरातील महत्त्वाचा असा गांगो मंदिर- टेंबवाडी ते रवळनाथ मंदिर हा 12 मीटरचा रिंग रोड कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी घेतलेल्या मेहनत यांच्या मुळेच सत्यात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. या मुळे टेंबवाडी वासियांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. या रस्त्यासाठी ज्या जमीन मालकांनी आपल्या जमिनी देऊन शहर विकासाला हातभार लावला आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानत असल्याचे सावंत यांनी सांगितले. तसेच या रस्त्यामध्ये कोष्टी समाजाचे गणेश मंदिर येत होते ते त्यानी स्वतःहून काढत शहरात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोष्टी समाजाने दिलेले हे योगदान कधीही न विसरणारे आहे. या भागाची नगरसेविका या नात्याने मी कोष्टी समाज बांधवांची ऋणी असल्याचेही त्या म्हणाल्या.
प्रामुख्याने माझ्या प्रभागामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स , अंतर्गत रस्ते , रिंग रोड ,गटर ,असतील यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी या प्रभागात देऊन खऱ्या अर्थाने मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे असे सौ सावंत यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!