कणकवली शहर भाजपा आयोजित वयोश्री योजना शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले
कणकवली शहर भारतीय जनता पार्टीतर्फे बूथ क्रमांक 289 टेंबवाडी, गांगोवाडी मध्ये वयोश्री योजनेचे शिबीर संपन्न झाले. 35 पेक्षा जास्त लाभार्थीनी फॉर्म जमा केले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेविका मेघा सावंत, माजी नगरसेवक अभय राणे, संजना सदडेकर, प्राची करपे, सागर राणे, बूथ प्रमुख परेश परब, औदुंबर राणे, माजी नगरसेवक अभि मुसळे, शिव शंकर पारगावकर, रुपेश साळुंखे, बंडू राणे, आदर्श राणे, संतोष राणे, व्यंकटेश सावंत, संदेश आरडेकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी