सेट परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवल्याबद्दल कीर्ती पाटील हिचा ज्ञाती बांधवांच्या वतीने सत्कार
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळाच्या वतीने घरी जात कीर्तीचा केला गौरव
ज्ञाती मंडळाने केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी
कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंत आणि फोंडाघाट काॅलेज च्या साहायक प्राध्यापिका हरकुळ बुद्रुक येथील किर्ती संतोष पाटिल
यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश प्राप्त केले. त्या बद्दल कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, तालुका कणकवली. संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सहायक प्राध्यापिका कु.किर्ती पाटील या फोंडाघाट येथे महाविद्यालयात कार्यरत आहेत. मागिल वर्षी पहील्याच प्रयत्नात त्यानी नेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनतर त्यांनी आता अर्थशास्त्र या विषयात पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे .हरकुळ बुद्रुक सारख्या ग्रामिण भागात आज रस्ता इंटरनेट मोबाईल रेंज अशा आणि अनेक अडचणी वर मात करत कु. किर्तीने मिळवीलेले यश महत्त्वाचे आणि दखलपात्र असेच आहे. नेट सेट या परिक्षेची काठिण्य पातळी खुपच अवघड
अशीच असते. निकालाचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरकुळ बुद्रुक- कणकवली -फोंडाघाट असा प्रवास करत आपली नोकरी सांभाळून हि परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारी कु.किर्तीचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.किर्तीच्या या यशाबद्दल तीचे कौतुक करण्यासाठी संस्थेच्या वतीने हरकुळ बुद्रुक येथे कु.किर्तीचा सत्कार संस्थेचे सल्लागार आणि मार्गदर्शक लक्ष्मण प्रभू (गुरुजी) यांचे हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव सामंत, कार्यवाह ॲड. एन. आर. देसाई, कार्यकारिणी सदस्य सुरेश परुळेकर, राजेश तथा राजू आजगावकर, प्रसन्ना देसाई, युवा कार्यकर्ते सुयोग टिकले, अखिल आजगावकर, राहुल केळुसकर अक्षय आजगावकर हजर होते,
संस्थेच्या वतीने आपण माझा सत्कार केला त्यामुळे मी भारावून गेले आहे. आपण खास माझा सत्कार करण्यासाठी घरी आलात कौतुक केलात पाठीवर शाबासकीची थाप मारली खुप आनंद झाला. संस्था नेहमीच माझ्या यशाचे कौतुक करित आली आहे. यामुळेच आणखी नव्याने काम करण्याची स्फूर्ती उमेद मिळते. यापुढे असेच काम करुन ज्ञातीचे नाव उज्ज्वल करण्याची इच्छा व्यक्त केली. पाटील कुटुंबीयांनी
यावेळी संस्थेने घरी येऊन आपल्या मुलीचा सत्कार केला यासाठी समाधान व्यक्त केले.यावेळी किर्ती चे काका मधू पाटिल, काकी, भाऊ हजर होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली