कलमठ लांजेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन.

तीन पिढ्याची परंपरा असलेल्या मांडावर रंगणार भव्य आमने सामने डबलबारी.

महाप्रसाद तसेच सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे श्री. बाबू नारकर यांचे आव्हाहन.

कणकवली/मयूर ठाकूर.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उद्या कणकवली येथील कलमठ येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. श्री. बाबू नारकर यांच्या निवास्थानी हा मांड असून तीन पिढ्यांची परंपरा आजही जपली जाते. मोठ्या उत्साहात हा जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा केला जातो. यनिमित्त विविध भजने तसेच महा डबलबारीच आयोजन केल जात. सालाबात प्रमाणे याही वर्षी रात्रौ ठीक 9 वाजता प्रसिद्ध भजनी बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा संदीप पुजारे यांच्यात आमने सामने डबलबारीच आयोजन केले आहे. तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.कलमठ लांजेवाडी येथील बाबू नारकार यांच्या निवासस्थानी हे सर्व कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन बाबू नारकर यांसकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!