पराग अशोक कांबळे – शेर्पेकर यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान..

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे शुभहस्ते गौरव..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शेर्पे ता.कणकवली या गावातील मूळ रहिवासी व सद्या वैद्यकीय व्यवसायानिमित्त मुंबई – विरार येथे स्थायिक असलेले श्री पराग अशोक कांबळे (शेर्पेकर ) यांचा नुकताच १५ आगस्त स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर/सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण यांचे शुभहस्ते मुंबई – विरार येथे “पुढारी हेल्थ आयकॉन ॲवॉर्डस तथा सन्मान आरोग्य दुतांचा हा पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.
विरार येथील विवांता हॉटेल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा,आमदार हितेंद्र
ठाकूर,आमदार राजेश पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैद्यकीय शेत्रात ग्रामीण आणि दुर्गम भागात तसेच शहरी भागात समर्पितपणा दाखवून रुग्ण सेवा देणाऱ्या आणि वैद्यकीय शेत्रात विशेष योगदान दिलेल्या डॉक्टर पासून ते आरोग्य सेवक आणि परिचारकापासून ते सफाई कामगार पर्यंत सेवा देणाऱ्या अनेकांचा यावेळी आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकते श्री अशोक पांडुरंग शेर्पेकर यांचे पराग कांबळे हे चिरंजीव असून विरार येथे त्यांचा गेली १० वर्षे मेडीकलचा व्यवसाय आहे.त्यांच्या या अहोरात्र सेवे बद्दल नुकताच त्यांचा अरोगयदुत पुरस्काराने सन्मान करण्यात आला.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!