स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला NEMS स्मार्ट कीड्स च्या उंबर्डे शाखेचे थाटात उदघाट्न

नडगिवे येथील आदर्श एजयुकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या उंबर्डे ता.वैभववाडी येथे विशेष करून शिशु वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या नूतन शाखेचे उदघाट्न प्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते प्रवीणकुमार भारदे यांच्या शुभेच्छा हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.
त्यावेळी अत्यंत कमी वयात शिक्षणाचा वसा घेऊन ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवत धाडसी पावले उचलून धडाडीने कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांचे कौतुक करत अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी शिक्षण क्षेत्राविषयी आपली असणारी तळमळ व्यक्त केली. “तुम्ही एक पाऊल पुढे या, मी तुमच्यासाठी शंभर पावले टाकायला तयार आहे.” अशा शब्दात उपस्थितना विश्वास दिला. त्यावेळी सन २००४ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेच्या मार्गक्रमणावर दृष्टिक्षेप टाकणारी ध्वनीचित्रफित लक्षवेधी ठरली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासाठी नेहमीच कार्यरत असणारे संस्थाध्यक्ष व संस्था पदाधिकारी यांचा गौरव उपस्थित ग्रामस्थांनी केला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिशु वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात विद्येची देवता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. त्यावेळी प्रशाळेतील संगीत शिक्षक हेमंत तेली आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. मनोजजी गुळेकर सर, सचिव मोहन कावळे, सहसचिव राजेंद्र ब्रम्हदांडे, खजिनदार परवेज पटेल, सचिन पवार, राजापूर अर्बन बँकेचे मॅनेजर बिर्जे सर, तेजस जमदाडे, आशिष भोसले, नयन दुधवडकर,शाळेचे जागा मालक श्यामराव दळवी, किशोर दळवी, सयाजी जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर कर व सर्व सदस्य नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या मुख्याध्यापिका नीलम डांगे विद्यार्थी, समन्वयक अभय तावडे, PRO प्रवीण कुमार पेडणेकर,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवेच्या सहाय्य्क शिक्षिका पूजा सावंत व रोहिणी मर्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!