GDCA तथा CHM परीक्षा केंद्र कोकणात करा!

अनिकेत वालावलकर यांची आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मागणी

GDCA तथा CHM ह्या सहकार क्षेत्रातील अतिमहत्वाच्या अशा परीक्षा देण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षार्थी यांना मुंबई पुणे किंव्हा कोल्हापूर ह्या जिल्ह्यात जावे लागते, 6 परीक्षा पेपर देण्याकरिता निवास,भोजन,प्रवास खर्च पाहता परीक्षार्थ्यांचा कुठे तरी परीक्षेत सहभाग घेण्याबद्दलच्या आत्मविश्वासात हिरमोड होतो. कोकण जरी समृद्ध असला तरी इथली लोकं अजून आर्थिक दृष्ट्या तशी सक्षम नाहीत. मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे , सोलापूर, सातारा , सांगली , कोल्हापूर, संभाजीनगर, लातूर, अकोला, अमरावती ,नागपूर,चंद्रपूर असे साधारण 16 परीक्षा केंद्र आहेत पण शैक्षणिक कोकण विभाग (रत्नागिरी सिंधुदुर्ग) येथे एक ही परीक्षा केंद्र नसावे ही खेदाची बाब आहे. असे सहकार भारती चे ठाणे महानगर जिल्हा महामंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अनिकेत रवींद्र वालावलकर यांनी आमदार निरांजन डावखरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. साक्षरता म्हणा किंव्हा दहावी बारावी म्हणा आज हा विभाग अनेक वर्ष प्रथम स्थानी आहे. इथल्या माती सोबत इथल्या तरुणांची बुद्धी देखील सुपीक आहे. मग रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सहकार क्षेत्रातील ह्या परीक्षा केंद्रापासून वंचित का? बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश सुं गाळवणकर ह्यांनी कोकणातील विध्यार्थ्यांची सहकार शिक्षणात उन्नती व्हावी म्हणून मोठ्या मनाने त्यांच्या महाविद्यालयाचे वर्ग उपरोक्त परीक्षाकेंद्र म्हणून वापरण्यास पुढाकार घेतला.
सहकार भारती तर्फे आम्ही सहकार मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, प्रदेश सहकार आयुक्त पुणे तसेच कोकण विभाग सहकार आयुक्त ह्यांना देखील निवेदन दिले आहेत. आज कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे ह्यांना देखील निवेदन दिले. त्यांनी कोकणातील हा शैक्षणिक महत्वाचा विषय स्वतः पुढे घेऊन जाऊन पाठपुरावा करणार असा विश्वास दिला.
कोकण विभागात सहकार क्षेत्रात अनेक शैक्षणिक,सामाजिक , तसेच व्यावसायिक धोरणे रबविण्यास विविध विषय सहकार भारतीने हाती घेतलेले आहेत. ज्या मध्ये प्रत्येक वाटेवर कोकणातील अनेक स्थानिकांनी समर्थन दर्शविले, आणि स्थानिकांचा हाच विश्वास कोकणातील आमच्या सहकार चळवळीची ताकद आहे. असे ठाणे महानगर जिल्हा महामंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गजिल्हा संपर्क प्रमुख सहकार भारतीचे अनिकेत रवींद्र वालावलकर यांनी म्हटले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!