विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत संरक्षक कायदे व करिअर मार्गदर्शन

तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे

मान्यवरां कडून विद्यार्थ्याना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगातून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना संरक्षक कायदे व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले . कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान तसेच सायबर गुन्हे यांच्या विळख्यात सापडलेली नविन पिढी वाचविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले . कणकवलीचे पोलिस उपनिरिक्षक अमोल शिंदे व राजकुमार मुंढे यांनी कायदा व सुव्यवस्था बाल गुन्हेगारी तसेच कुमार वयोगटातील व्यसनांचे परिणाम यापासून नव्या पिढीचे होणारे नुकसान या विषयी जागृतेने कायद्याचे शिक्षण या दोन्ही अधिकाऱ्यांनी सुंदर मार्गदर्शन करून भावीपिढी नव्या जीवनासाठी व जगण्यासाठी करिअरच्या अभ्यासात गुंतण्याचे आवाहन केले कणकवलीचे सुप्रसिद्ध वकील ॲड . उमेश सावंत यांनी आदर्श जीवनाची सुत्रे आपल्या भाषणातून कथन करत करिअर निवडीचे महत्व विषद केले . मुख्याध्यापक पिराजी कांबळे यांनी जगणे सुंदर आहे हे जग मी सुंदर करून जाईन या विषयी विचार मांडले . या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री किरण कदम तसेच सौ खडपकर व साथिदार यांनी मदत केली कार्यक्रमाचे निवेदन .श्री सिंगनाथ यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती अच्युतराव वणवे, श्री संदिप कदम सर श्री खरात व विद्यार्थी उपस्थित होते .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!