पूर्णानंद पर्णकुटी फोंडाघाट येथे गुरु पौर्णिमा साजरी

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण संस्थेच्या वतीने आयोजन
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण संस्थेच्या नव्या दमाचे युवा कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पूर्णानंद पर्णकुटी मध्ये धुप आरती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश सामंत, कार्यकारिणी सदस्य अरूण सामंत, प्रसाद वालावलकर, जेष्ठ कार्यकर्ते अशोक नेरूरकर आणि युवा कार्यकर्ते सुयोग टिकले,पतांजली टिकले, अखिल आजगावकर, प्रथमेश सामंत, प्रथमेश महाजन, रसिक नेरूरकर,मंदार अवसरे, रोहन तारळेकर, अक्षय आजगावकर, हर्षद केळूसकर,प्रतिक माईणकर, चेतन प्रभू उपस्थित होते.
पुढील वर्षीची गुरूपौर्णिमा नियोजनबद्ध पद्धतीने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्याचा मानस युवा कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या आयोजनाचे अध्यक्ष यांना कौतुक केले.
दिगंबर वालावलकर कणकवली