जाणवली शिक्षक कॉलनी येथील चारुशिला भोगले यांचे निधन

जाणवली शिक्षक कॉलनी येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका चारुशिला गजानन भोगले ( वय 84) यांचे वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने 20 जुलै 2024 रोजी निधन झाले.
चारुशिला भोगले यांनी प्राथमिक शिक्षिका म्हणून कणकवली तालुका स्कुल त्याचप्रमाणे कलमठ बाजारपेठ ,करुळ ,जाणवली मारुती मंदिर व अन्य शाळांमध्ये शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शैलेश भोगले यांच्या त्या आई तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांच्या त्या सासू होत.
कणकवली प्रतिनिधी