शिक्षक समिती कणकवली कडून दिविजा वृद्धाश्रम ला अन्नधान्य वाटप.

कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* च्या 62 व्या *वर्धापन दिनानिमित्त* शिक्षक समिती * शाखा कणकवली यांच्यावतीने *दिनांक 20 जुलै 2024* रोजी दिविजा वृद्धाश्रम असलदे या ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले.
*जे का रंजले गांजले, त्यांशी म्हणे जो आपुले ..तोचि साधू ओळखावा, देव तेथिची जाणावा** ... या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची उपक्रम राबवत असते.
सोमवार दिनांक 22-07- 2024 रोजी शिक्षक समितीचा वर्धापन दिन असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये समितीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कणकवली तालुक्यामध्ये हा वर्धापन दिन साजरा करत असताना दिविजा वृद्धाश्रम असलदे ता.कणकवली या ठिकाणी भेट देण्याचे निश्चित झाले. या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नधान्य वाटप करुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी श्री.टोनी म्हापसेकर -अध्यक्ष
श्री.संतोष कांबळे-सचिव
श्री.विनायक जाधव-प्रवक्ते
श्रीम.निकिता ठाकूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
श्री.संतोष कुडाळकर -जिल्हा कार्याध्यक्ष
श्री.धीरज हुंबे -जिल्हा उपाध्यक्ष
श्री.दिनेश जंगले-तरळे प्रभाग विभागीय अध्यक्ष
श्रीम.नेहा मोरे-महिला आघाडी तालुकाध्यक्ष
श्रीम.ऋतुजा जंगले -शिक्षक पतपेढी संचालक
श्रीम.नेहा तांबे
मालवण शिक्षक समिती महिला पदाधिकारी
श्री.ईश्वरलाल कदम – जिल्हा संघटक
श्री.निलेश ठाकूर -जिल्हा संघटक
श्री.सुशांत मर्गज -माजी कणकवली सचिव
ज्येष्ठ सदस्या श्रीम.सुप्रिया महाजन सदस्य श्री.सुभाष गावकर
श्री.हाडशी सर श्रीम.अनुजा कदम मॅडम इत्यादी उपस्थित होते.