जनतेचे सेवक विशाल परब (भाजप,प्रदेश युवा उपाध्यक्ष) यांच्या कडून आरवली देऊळवाडी येथील पुरग्रस्त घराचे मालक अब्बास शेख यांना आर्थिक मदत

विशाल परब (भाजप,प्रदेश युवा उपाध्यक्ष) हे आषाढी एकादशी निमित्त श्री देव वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी आले असताना तेथील स्थानिक भाजप कार्यकर्ते यांनी गेल्या आठवडयात भरपूर पाऊसामुळे आरवली गावात सखल भागात पाणी साचले होते त्या मध्ये आरवली देऊळवाडी येथील अब्बास कासम शेख यांच्या संपूर्ण घराला पाण्याने वेढा घातला होता त्यामुळे त्यांच्या घरातील भिंती पडल्या होत्या ही वस्तुस्थिती त्यांना सांगितली हे ऐकल्यावर सतत जनतेच्या संपर्कात असणारे जनतेच्या अडीअडचणीत मदत करणारे विशाल परब यांनी ताबडतोब घराच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थिची पाहणी केली आपल्या कडून या घराचे मालक यांचा मुलगा समीर शेख यांना आर्थिक मदत दिली यावेळी
विशाल सेवा फाऊडेशन चे राजाध्यक्ष,आरवली भाजप,शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,भाजप आरवली पदाधिकारी नामदेव आरोलकर,भाजप वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर व विजय पडवळ शिरोडा शहर भाजप अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,नारायण उर्फ बाबल गावडे,दादा शेटये,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त,आसोली उपसरपंच संकेत धुरी,आरवली भाजप महिला पदाधिकारी सौ.नंदिनी आरोलकर,आरवली ग्रामस्थ तुषार रगजी उपस्थित होते