विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला रोटरी क्लब व व्यापारी संघ कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बेंच प्रदान

संस्थेच्या वतीने मानले दात्यांचे आभार
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली या प्रशालेला रोटरी क्लब कणकवली व व्यापारी संघ कणकवली या दोन्ही संस्थेने मिळून विद्यामंदिर प्रशालेला पन्नास बेंच ( डेस्क ) प्रदान करण्यात आले . या कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, उपस्थित होते . रोटरी क्लब कणकवली शाखेचे सर्व पदाधिकारी ‘सदस्य तसेच व्यापारी संघ कणकवलीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते रोटरीचे माजी अध्यक्ष रवी परब ‘ डॉ विदयाधर तायशेटे दादा कुडतरकर , अशोक करंबळेकर ‘ राजेश राजाध्यक्ष ॲड अंधारी ‘ प्रणय तेली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलेवलकर विलास कोरगावकर श्री पारकर व सदस्य याच्या समवेत डेस्क प्रदान सोहळा कृतज्ञता कार्यक्रम पार पडला यावेळी रवी परब यांनी रोटरीची कार्यपद्धती आणि महत्व याविषयी माहिती सांगितली . दादा कुडतरकर यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या श्री करंबेळकर यांनी रोटरी क्लब आणि मदतीचे महत्व विषद केले . डॉ विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लबची कर्तव्य काय असतात तसेच शैक्षणिक कार्यासाठी रोटरी क्लबने केलेली मदत या विषयी माहिती देवून शुभेच्छा दिल्या . रोटरीचे नुतन अध्यक्ष प्रा जगदिश कदम यांनी रोटरी क्लब आणि सर्जनशिलता याचे महत्व विषद केले मा प्रणय तेली साहेब यांनी दातृत्वाचे कर्तव्य कोणते आणि विनियोग कसा करावा या विषयी सुंदर विचार मांडले . शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री वळंजू यांनी रोटरी क्लब व व्यापारी संघ यांच्या बेंच प्रदान कृतज्ञता सोहळ्या विषयी सर्वांचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दोन्ही संस्थेनी हातभार लावून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तम सोय केली असे गौरवोद्गार काढले . मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे यांनी आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे यांनी प्रास्तविक करून प्रशालेच्या विकासाचा आढावा घेतला . व रोटरी क्लब ‘ व्यापारी संघ यांच्या दातृत्वा बद्दल शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी व रोटरीचे क्लबचे सर्व पदाधिकारी ‘ तसेच व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आभार श्री सिंगनाथ यांनी मांडले .
कणकवली प्रतिनिधी