पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते विभागातील चिंचवली मधलीवाडी, नडगिवे नं. 1, कुरंगवणे खैराट या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले..
या प्रसंगी खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, चिंचवली सरपंच अशोक पाटील,कुरंगवणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, उपसरपंच निवृत्ती पवार, चिंचवली बुथ कमिटी अध्यक्ष रवींद्र गुरव, नडगिवे सरपंच सौ.माधवी मण्यार,उपसरपंच भूषण कांबळे,नडगिवे बुथ कमिटी अध्यक्ष अरुण कर्ले यांसह सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते..

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!