मसुरकर किनई रस्त्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने

कणकवली नगरपंचायत बैठकीत ठेकेदाराच्या मुद्द्यावरून वातावरण तापले
अन्यथा त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा सत्ताधारी नगरसेवकांची मागणी
कणकवली शहरातील मसुरकर किनई रस्त्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक बंडू हर्णे यांनी सदर रस्त्याचे 40 लाखाचे खड्डे भरण्यासाठी काम असल्याचे सोशल मीडिया मधून बातमी आली होती. असा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर असा मुद्दा कोणी मांडला ते सांगा असे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले त्यावर हर्णे यांनी बाळू पारकर यांनी सदर माध्यमांमध्ये ही बातमी दिल्याचे सांगितले. त्यावर श्री पारकर यांनी पुरावा दाखवा पुरावा दाखवला तर तुमची जाहीर माफी मागू. अन्यथा तुम्ही आमची माफी मागा असे सांगितले. यावेळी आर्या राणे यांनी सदरचा रस्ता अद्याप झालेले नसल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. ठेकेदार आपले पैसे मिळत नसल्याचे सांगत असल्याचे आर्या राणे यांनी सांगितले. त्यावर ठेकेदार कोण आहे? असा सवाल सत्ताधारी नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर सदर ठेकेदार काम घेऊन जर काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा अशी मागणी संकेत नाईक, जयेश धुमाळे यांनी केली. अखेर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी विषय पत्रिकेतील विषय व्यतिरिक्त चर्चा करू नका अशी सूचना मांडली.




