मालवण आचरा अक्कलकोट एसटी फेरीचा शुभारंभ

माजी सरपंच चंदन पांगे यांच्या प्रयत्नांना यश

आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला आचरा येथून शुभारंभ

भाविकांची आणि प्रवाशांची मागणी असलेल्या आचरामार्गेअक्कलकोट बस फेरीचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी मालवण येथून झाला.आचरा येथे बस फेरी येताच आचरा सरपंच व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे स्वागत केले.यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून आचरा येथून शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी सरपंच चंदन पांगे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळी,माजी उपसभापती अशोक बागवे, दिलीप कावले, प्रविण आचरेकर, निवृत्ती आचरेकर,,आचरा कन्ट्रोलर दिनेश साळकर, वाहक एसडी कांबळे,,चालक एएन गव्हाणे तसेच आचरेकर,भरत पटेल,किशोर आचरेकर, शैलेश राणे, दिनेश कांबळी , प्रशांत सावंत यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.सदर फेरी मालवण येथून दुपारी ३.४५ वाजता निघून आचरा येथून ४.३० वाजण्याच्या दरम्याने कणकवली गगनबावडे,कोल्हापूर पंढरपूर,सोलापूर करुनअक्कलकोट कडे निघणार आहे.तर दुसऱ्या दिवशी परतीची फेरी अक्कलकोट येथून सायंकाळी ६.३० वाजता सुटणार असल्याची माहिती आचरा कन्ट्रोलर दिनेश साळकर यांनी दिली.सदर फेरी सुरु करण्यासाठी आचरा माजी सरपंच चंदन पांगे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच निवृत्ती आचरेकर, प्रवीण आचरेकर, महेंद्र मांजरेकर,नरेश तारकर, विजय पांगे यांसह या भागातील सर्व ग्रामपंचायतींचे सहकार्य लाभल्याचे पांगे यांनी सांगितले.

error: Content is protected !!