शिवडाव माध्यमिक विद्यालयाची धाडसी विद्यार्थिनी कु.सई सावंत हिच्या जिद्दीला सलाम

रात्री आईचे दुःखद निधन : तरीही सकाळी मनोबल दाखवत दिला दहावीचा शेवटचा पेपर

कणकवली/प्रतिनिधी

शिवडाव माध्यमिक विद्यालय,शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.सई संतोष सावंत हिने अत्यंत कठीण आणि दुःखद प्रसंगातही दाखवलेल्या धाडसाने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे.काल रात्री उशिरा सईची आई कै.साक्षी सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.या अचानक घडलेल्या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.अशा परिस्थितीत कोणतीही व्यक्ती खचून जाईल,मात्र सईने अतिशय धैर्य आणि मनोबल दाखवत आज होणाऱ्या दहावीच्या शेवटच्या पेपरला उपस्थित राहण्याचा निर्धार केला.शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने सई परीक्षाकेंद्रावर वेळेत पोहोचली आणि तिने आपला पेपर पूर्ण केला.तिच्या या जिद्दीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कै.साक्षी सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून,सावंत कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो, अशी प्रार्थना व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!