कुडाळ शहरात उद्या रंगणार महिलांची रस्सीखेच स्पर्धा

स्पर्धेत १४ संघांचा सहभाग

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेना आयोजित महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा उद्या बुधवार १८ मार्च रोजी सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानावर होणार असून या स्पर्धेमध्ये १४ संघानी सहभाग दर्शवला आहे त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार होणार आहे.
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांची रस्सी खेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रोख रुपये १० हजार व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास रोख रुपये ५ हजार व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकास रोख रुपये ३ हजार व प्रमाणपत्र तसेच सहभागी संघातील स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर या स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला स्पर्धेमध्ये १४ संघानी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा बुधवार १८ मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!